Durchya Ranat / दूरच्या रानात
दूरच्या रानात
केळीच्या बनात
हळदिवे ऊन्ह गर्द
पिवळ्या पानात.
झिळमिळ झाडांच्या
झावळ्या दाटीत
पांदीतली पायवाट
पांगली पाण्यात.
झुलत्या फांदीच्या
सावुल्या पाण्यात
काचबिंदी नभ उभं
सांडलं गाण्यात
लखलख उन्हाची
थर्थर अंगाला
हरवल्या पावलांची
कावीळ रानाला.
दूरच्या रानाला
लागिर उन्हाला
पारंबीचा झुला गेला
झुलत नभाला.
गीत : दूरच्या रानात
गीतकार : ना. दो. महानोर
गायक : वैशाली सामंत
संगीत लेबल: Sumeet Music