Gandha Phulancha Gela Sangun / गंध फुलांचा गेला सांगून
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे मीलन
सहज एकदा जाताजाता, मिळुनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत मोहना गेली बांधून
विरह संपता, मीलनाची अमृतगोडी चाखित असता
सखया अवचित जवळी येता, ढळे पापणी गेले लाजून
मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन
गीत: पी. सावळाराम
संगीत: विश्वनाथ मोरे
स्वर: आशा भोसले, सुरेश वाडकर
चित्रपट: भालू
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत