Geet Houn Aale Sukh Majhe / गीत होऊन आले सुख माझे
गीत होऊन आले सुख माझे आले, साजणा
स्वप्न कल्पनेत होते सूर-ताल तेच झाले, साजणा
गीत राणी स्वये तू. तूच माझी, माझी भावना
आस तूच या स्वरांना, रंग मैफलीचा, सजणी तूच ना?
गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना !
अशा सहवासी जीव सुखवासी
कुणी जन्म गुंफिले सांग ना?
साजणी, सांग ना !
गीत माझे-तुझे हे, तूच माझीमाझी भावना !
कुहूकुहू बोले, कोयल बोले रे
जणू तुझे-माझे राजा
तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले, साजणा
गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना !
तुझे-माझे घर सुखाचा संसार
दीठ संसारा न लागो, साजणा
गीत: शान्ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: वर्षा भोसले, सुरेश वाडकर
चित्रपट: संसार
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत