भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ghan Tami Shukra Bagh Marathi Lyrics | घन तमीं शुक्र बघ

Ghan Tami Shukra Bagh / घन तमीं शुक्र बघ

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

 

गीत: भा. रा. तांबे
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत


You may also like

आनंदघन चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग राम कदम लता मंगेशकर साधी माणसं सुधीर फडके

ऐरणीच्या देवा तुला (Airanichya Deva Tula Lyrics)

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लेऊ लेनं गरीबीचं
भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार