Gheu Kasa Ukhana / घेऊ कसा उखाणा
घेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा?
का लाजले अशी मी, माझे मला कळेना
माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे
या कमललोचनांनी कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभूचे का ठाउके न कोणा?
स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले
या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले
शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा?
मज रूप लक्ष्मीचे तू नाथ शेषशायी
माझी अनन्य प्रीती झाली विलीन पायी
माझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: थांब लक्ष्मी कुंकू लाविते
गीत प्रकार: चित्रगीत