Giridhara Pudhe Ya Nachin / गिरिधरापुढे या नाचिन मी
गिरीधरापुढे या नाचिन मी
नाचून रिझवीन प्रिय रसिकाला
प्रेमीजनांना दुखवीन मी
प्रीतिची घालून घुंगुरे
रतीवसने परिधानीन मी
गिरीधरापुढे या नाचिन मी
लोकलाज कुलमर्यादा
यापैकी काही न ठेवीन मी
गिरीधरापुढे या नाचिन मी
रायाच्या पहुडेन पलंगी
रंगे मीरा हरीप्रेमी
गिरीधरापुढे या नाचिन मी
गीत: श्रीकृष्ण पोवळे
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: आशा भोसले
चित्रपट: यंदा कर्तव्य आहे
गीत प्रकार: चित्रगीत