Hati Nahi Bal / हाती नाही बळ
हाती नाही बळ, दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये !
घालवेना चारा, होई ना जतन
त्याने तो गोधन पाळू नये !
सोसता सोसेना संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये !
नामसंकीर्तना गवसेना वेळ
त्याने गळा माळ घालू नये !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: आशा भोसले
चित्रपट: चिमणी पाखरं
गीत प्रकार: चित्रगीत