Bhannat Raan Vara / भन्नाट रानवारा
भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली
रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी
पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी
गीत: सुधीर मोघे
संगीत: सुधीर मोघे
स्वर: उत्तरा केळकर, सुरेश वाडकर
चित्रपट:कशासाठी? प्रेमासाठी!
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत