Hi Kuni Chedili Taar / ही कुणी छेडिली तार
ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार
तूच छेड ती, तूच ऐक ती
आर्त सुरावट तुझ्याच हाती
स्पर्षावाचुन तूच छेडिसी
माझी हृदय-सतार
जागृत मी का आहे स्वप्नी ?
श्रवणि पडे पण दिसे न नयनी
स्वप्नातच का मजसि बोलले माझे राजकुमार
स्वप्नासम मज झाले जीवन
स्वप्नही नीरस सखी, तुझ्यावीण
अर्ध्या रात्री शोधीत आलो तुझे प्रियतमे, दार
वेलीवर त्या नका, चढू नका
चढा सूर नच लवे गायका
तूच चढविला तारस्वर हा तूच तोड ही तार
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: पु. ल. देशपांडे
स्वर: पं. वसंतराव देशपांडे, आशा भोसले
चित्रपट: गुळाचा गणपति
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत