Hirvya Panan | हिरव्या पानांन
कळला पोरी कळला
सखे तुझा इशारा गो कळला
भिनला पोरी भिनला
रूप तुझा यो मनानं हेरला
आता जाऊ नको अशी दूर गो
तुझे हृदयानं हाय ते करगो कबूल
तुझा छंद जीवाला लागला हाय
हिरव्या पानांन हिरव्या पानांन
रूप तुझं ग सजलं हाय
हिरव्या पानांन हिरव्या पानांन
रूप तुझं ग सजलं हाय
तुझा इष्काचा जाल्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय
हिरव्या पानांन हिरव्या पानांन
रूप तुझं ग सजलं हाय
तुझा इष्काचा जाल्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय
तुझा इष्काचा जाल्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय
वादळं सुटलाय गो इष्काचा
आपले दोघांचा पिरमाचा
तुझा ओठांचं नाजूक हसणं
ताबा घेतंय माझे दिलाचा
रंग नवा ह्यो हाय पिरतीचा
आपले दोघांचा जीवनाचा
खूळ झालंया मन हे माझं
जीव जडलाय तुझेंव माझा
रूप तुझं या मनानं भरलंय
कशी झयली हि जादू
रूप तुझं या मनानं भरलंय
कशी झायली हि जादू
रूप तुझं या मनानं भरलंय
कशी झायली हि जादू
माझं काळीज धडधडू लागलंय
पाहून तुला खूप हा रडू रडू लागलंय
काय करू भान मला कसलंच नाही
हा दिल पण झाला पागल तुझा होऊ लागला
कशी देवानी केली हि करणी
सौंदर्य हे तुझं नक्षत्रावाणी
खोटं बोलत नाही माझी ग राणी
फील करतो मी तुला आणि लिहितो गाणी
तुला पाहून मी खोतो मानसिक संतुलन
केलीस का तू माझावर जादू मंतर
वाटतंय कि तू मला पटायची नाय
मी नाकवाचा पोर पाठ सोडायचा नाय
तुझा संगतीनं मन नादावलं
तुझा मिठीमंदी वेड विसावलं
ओठी तुझंच रे नाव गुणगुणलं
का शहार्यानी मन मोहरलं
जन्मभराच्या पिरतीसाठी
जुळलं आपलं रेशीमगाठी
तुला कळला इशारा नाखवा
मी आले तुझाचसाठी
तुला कळला इशारा नाखवा
मी आले तुझाचसाठी
हिरव्या पानांन हिरव्या पानांन
रूप तुझं ग सजलं हाय
हिरव्या पानांन हिरव्या पानांन
रूप तुझं ग सजलं हाय
माझा इष्काचा जाल्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय
माझा इष्काचा जाल्यामंदी
नाखवा पुरा आता ह्यो फसला हाय
गीत : हिरव्या पानांन
गीतकार : रोहन साखरे, वैशाली म्हस्के, चॅम्प डेव्हिलज
गायक : केवल वाळंज, सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Jigar Marathi