Marathi Songs Music मराठी गाणी सचिन पिळगावकर सुरेश वाडकर

Hrudhayi Vasant Fulatana Lyrics || हृदयी वसंत फुलताना

Hrudhayi Vasant Fulatana / हृदयी वसंत फुलताना 

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……(२)
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…

मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको……(२)
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे…….(२)

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय…
अवघी अवनी सजली धुंद मोहरली……(२)
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे…
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे…
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे …….(२)

मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय …
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी…
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा…
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……(२)
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे…(२)

गीत : हृदयी वसंत फुलताना
गीतकार : शांताराम नांदगावकर
गायक : अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी, सुरेश वाडकर
संगीत लेबल: Ishtar Regional

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा