Ishwaracha Thav Kadhi / ईश्वराचा ठाव कधी
ईश्वराचा ठाव कधी
एके ठायी सापडेना
शोधणारा शोध घेतो
मार्ग त्यास गवसेना
मूर्ति स्वत: निर्मुनिया
रूप सगुण पूजितो
येता संकटे ही माथी
त्याचा विसर पडेना
पूजितो त्या परमेशा
रीत वेगळी भक्तीची
अव्यक्ताची करी भक्ती
स्वये विभक्त असेना
गीत: विमलकीर्ती महाजन
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भक्तीगीत