Jagnyache Deva || जगण्याचे देवा
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना,
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना,
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना,
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना,
तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना..
ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग
मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…
गीत : जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
गीतकार : संजय कृष्णाजी पाटील,
गायक : स्वप्नील बांदोकर, पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर आणि आरोही म्हात्रे,
संगीत लेबल: राजश्री मराठी
गीत संग्रह / चित्रपट : दशक्रिया