आशा भोसले ग. दि. माडगूळकर भावगीत मराठी गाणी

Ja Bale Ja Marathi Lyrics | ​जा बाळे जा

Ja Bale Ja/ ​जा बाळे जा

जा बाळे जा, सुखे सासरी
नको गुंतवू मन माहेरी
भाग्यवती तू मुली खरोखर
लाखामधले एक मिळे घर
पणावाचुनी पूर्ण स्वयंवर
पुरुषार्थाची होसी सहचरी
शब्दांवाचून असते भाषा
जाण पतीचे भाव-मनीषा
सखी-सचिव तू होई शिष्या
वडील-गुरूची करी चाकरी
तुझा लाडका अल्लड वावर
आता कुठुनी माझ्या घरभर
द्राक्षरसाचा मधुर तुझा स्वर
पडेल कानी कुठुनी दिनभरी

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: अरुण पौडवाल
स्वर: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत


You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा