भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Jevha Tujhya Batana Udhali Marathi Lyrics || जेव्हा तुझ्या बटांना उधळी

Jevha Tujhya Batana Udhali / जेव्हा तुझ्या बटांना उधळी

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा?

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा?

 

गीत: मंगेश पाडगांवकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: सुरेश वाडकर
राग: मांड, मिश्र खमाज
गीत प्रकार: भावगीत

 

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा