Jhala Sakharpuda Ga Bai / झाला साखरपुडा ग बाई
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
रुणुझुणु चुडा हाती गाईल ग
शालू चमचम करील जरीकाठाचा
सांग माझ्या कानात नवरा कसा
शूर मर्द का भितरा ससा
रूप मदन का हुप्प्या जसा
बृहस्पती का येडापीसा
ऐक सांगते तिकडची स्वारी
रूप देखणं, नजर करारी
मर्द मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरुडभरारी
नगं बाई.. काय ग?
दिमाग अशी दाऊ ग
स्वर्ग झाला तुला ग दोन बोटांचा
झाला साखरपुडा !
नाकाचा सांडगा, गालाचा पापड
दळुबाई-कांडुबाई म्हणत्यात तसा
केळीच्या पानाला तूप लावुनी
वाढल्या शेवया खाईल कसा
शूर मराठा स्वार फाकडा
ऐट दावतो थाट रांगडा
ढाल पाठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
नगं बानू.. नगं बानू
रूपाला अशी भाळू नगं
कसा येईल फुलाला रंग देठाचा
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
गीत: शान्ता शेळके
संगीत: आनंदघन
स्वर: लता मंगेशकर, उषा मंगेशकर
चित्रपट: मोहित्यांची मंजुळा
गीत प्रकार: चित्रगीत