Jijau Prashasti || जिजाऊ प्रशस्ती
माता भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची
अष्टभुजा जणू कलि च्या युगे
मावळवासिनी पुण्यनिवासिनी
राष्ट्र उभारणी तू वर दे
धाक हा म्लेंच्छांना, आधार लोकांना
स्मरणे जिच्या जगी पुण्य मिळे
शिवरायांची तू शक्ती परात्पर
दिव्य रूप जिजामाऊलीचे
हे रणचंडी तू काली भवानी तू
शत्रू वधाची ती तृष्णा असे
पापविमोचिनी अन्याय मर्दिनी
खड्ग तू धारिणी घोर रूपे
यवना शासन दुष्टा ताडन
अभयदान स्त्रीस तूच असे
दानव देव हि भीती ज्या रूपा ते
क्रुद्ध रूप जिजा माऊलीचे
हे जगदंबा तू आलीस धावूनी
शक्ती बुद्धि तव ठायी वसे
हिंदवी राज्याचे पाहिले स्वप्न तू
स्थापिले स्वत्व स्वराज्य इथे
धर्म मराठयांचे कर्म मराठयांचे
मऱहट्टी मर्म हे तूच दिले
शिवरायांची तू शक्ती परात्पर
दिव्य रूप जिजामाऊलीचे
गीत : जिजाऊ प्रशस्ती
गीतकार : दिग्पाल लांजेकर
गायक : पूनम गोडबोले, भाग्यश्री अभ्यंकर, निधी हेगडे, मानसी दीक्षित, श्रुती देवस्थळी, सुवर्णा कोळी
संगीत लेबल: Everest Marathi