Ka Kalena / का कळेना
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशे धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे
जन्मांतरीचे!
एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू
सार्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू
सार्यात तू
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कशे
उमलती कशा धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे
जन्मांतरीचे!
घडले कसे कधी
कळले न जे कधी
हळुवार ते आले कसे
ओठावरी
दे ना तू साथ दे
हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी
इकरार घे
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे
जन्मांतरीचे!
गीत : का कळेना
गीतकार : सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले
गायक : स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे
संगीत लेबल: Everest Marathi