आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Kadhi Mi Pahin Ti Paule Marathi Lyrics | कधी मी पाहिन ती पाऊले

Kadhi Mi Pahin Ti Paule / कधी मी पाहिन ती पाऊले

सामर्थ्याहुन समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय?
पडे अहल्या शिळा त्यास्थळी येतिल प्रभुचे पाय !

कधी मी पाहिन ती पाऊले?

पाहिन केव्हा तो सोहळा
प्रभुचरणांचा स्पर्श कपाळा
आनंदाश्रू झरतिल डोळा
भाग्यच माझे दिसेल मजसी मूर्त उभे ठाकले !

रणांत जिंकुन कौरवसेना
यशसिद्धीच्या करित गर्जना
अभये अर्पित साधुसज्जना
पाच प्राणसे येतिल पांडव विजयाने न्हाले !

मारून रावण कपटी कामी
अशोकवनी या येतील स्वामी
वाहणार हे पदी प्राण मी
भेटीसाठी अशा अलौकिक कालचक्र थांबले !

देवाहुनही समर्थ भक्ती
स्वरांत माझ्या अमोघ शक्ती
सुफलित व्हाया माझी उक्ती
पंचकन्यका अर्पण करिती पुण्य मला आपले

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: सुवासिनी
गीत प्रकार: चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते