Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे कधी तू
कधी तू हसावे कधी तू रुसावे
नको ग नको ग नको साजणी !
सखी प्रीत माझी तुला वाहिली
तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली
नको हा बहाणा, असा दूर जा ना
नको ग नको ग नको साजणी !
कळी लाजरी ही फुलेना कशी
तिला भावना ही कळेना कशी
मुखी गोड भाषा, अशी ही निराशा
नको ग नको ग नको साजणी !
प्रिये राहसी तू मनी मानसी
जगावेगळी तू अशी प्रेयसी
मलाही कळावे, तुलाही जुळावे
नको ग नको ग नको साजणी !
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: एन्. दत्ता
स्वर: रवींद्र साठे, उषा मंगेशकर
चित्रपट: प्रीत तुझी माझी
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत