Kajava Uga Davito Diva / काजवा उगा दावितो दिवा
अंधारच मज हवा, काजवा उगा दावितो दिवा
काळे पातळ, काळी चोळी, भुवयांमध्ये रेखा काळी
काळा शेला पांघरले मी पानकळ्याची हवा
नको काजव्या संगे येऊ, नको कमळणी रोखुन पाहू
अरे पारव्या प्रीतभेटिचा प्रकार तुज का नवा
दूर नदीच्या पल्याड माझा, उभा राहिला असेल राजा
अशा चोरट्या भेटीमधला अवीट हो गोडवा
या पायांच्या दाही बोटा, अंधारातही दिसती वाटा
या मेघांनो आभाळातील काळेपण वाढवा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: भिंतीला कान असतात
गीत प्रकार: चित्रगीत