Kalale Tula Kahi / कळले तुला काही
कळले तुला काही कळले मलाही
झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही
कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू
सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू
नवख्या वयाला ये जाण काही
असा धुंद वारा अशा चंद्र-तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा
कशी रात गेली कुणा भान नाही
गीत: शान्ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: हे गीत जीवनाचे
गीत प्रकार: चित्रगीत