Kanha Disena Kuthe / कान्हा दिसेना कुठे
बावरले, मी काहुरले, धीर मनाचा सुटे
सयांनो, कान्हा दिसेना कुठे
सखा श्रीहरी स्वप्नी यावा
कदंब तरूच्या तळी बसावा
कधी हसावा कधी रुसावा
नयनी माझ्या भरुनी घ्यावे सगुण रूप गोमटे
मोहन दिसला ग दिसला
प्रीत जुळली ग, कळी खुलली ग
प्रीत जुळली ग, कळली ग त्याची कला
मूर्ती सजणाची, ती प्रतिमा मदनाची
भाषा मज कळली, नयनांची नयनांची
झाले बेधुंद रूप पाहुनी
मनमोहन हृदयी ठसला
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: आशा भोसले
चित्रपट: दाम करी काम
गीत प्रकार: चित्रगीत