Kanha Song / कान्हा
का , उमगंना
कसं का समाजना
लगीरं हे तुझं मोहना, सरंना
का तळमळ, मन का घुटमळं
हरवलं काळीज
राधेला कळंना ।।
मुरलीचा, सूर जुळतो
जीव जळतो त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा ।।
का संगतीचं सुख खुणावत राही रं
का बिलंगून , मन रीतं रीतं राही रं
का गुतलेलं जिणं उसवत राही रं
का पुनवच्या संगतीला चांद न्हाई रं
अवघड हि विरहाची कळ साहीना
नजर आता जग तुझ्याइन पाहीना
मुरलीचा, सूर जुळतो
जीव जळतो, त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा ।।
गीत : कान्हा
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अजय गोगावले
संगीत लेबल: Everest Marathi