Karu Det Shringar / करु देत शृंगार सख्यांनो
करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार
अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार
जिवंत पति, मी सती जातसे
भाग्य लाभले कुणा कधी असे
मृदुलमृदुल तर या कमलाचा यज्ञी स्वाहाकार
ही भाग्याची वेळ साजणी
भांग भरा ग गुंफा वेणी
राजपुतीच्या नयनी का कधि दिसते अश्रूधार
मला न माहित कोण यवन तो
कोण जाणते मृत्यु काय तो
हासतहासत मिठी मरणाला हा अमुचा संसार
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: पु. ल. देशपांडे
स्वर: आशा भोसले
चित्रपट: देवबाप्पा
गीत प्रकार: चित्रगीत