Kas kaay patil bar haay ka / कसं काय पाटील बरं हाय का
कसं काय पाटील बरं हाय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
अहो राव तुम्ही
ते नाही तुम्ही
अहो चष्मेवाले तुम्ही
न्हाई न्हाई न्हाई न्हाई
फेटेवाले तुम्ही
सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का
काल म्हनं तुम्ही जत्रेला गेला
तमाशात काळीज इसरून आला
इसरल्या ठाई गावलं का न्हाई
आज तरी संगती आनलंय का
काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला
कमरेचा ऐवज हरवून आला
केली वाटमारी, सांजच्या पारी
आज काय शिल्लक ऱ्हायलंय का
काल म्हनं तुम्ही हितं तिथं गेला
अन् बघता बघता घोटाळा झाला
काय झालं पुढं सांगा तरी थोडं
खाली नका बघु आता लाजताय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का.. खरं हाय का
खरं हाय का.. खरं हाय का.. खरं हाय का..
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का
कसं काय पाटील बरं हाय का
सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं आहे का
खरं आहे का.. खरं आहे का.. खरं आहे का..
गीत : कसं काय पाटील बरं हाय का
गीतकार : जगदीश खेबुडकर
गायक : सुलोचना चव्हाण
संगीत लेबल: Saregama Marathi