Marathi Songs Music अजय गोगावले आर्या आंबेकर गुरु ठाकूर मराठी गाणी

Kevadyacha Paan Tu Marathi Lyrics || केवड्याचं पान तू

Kevadyacha Paan Tu / केवड्याचं पान तू 

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
गं भान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
गं भान तू

सागराची गाज तू
गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याचं
सपान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
गं भान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
रं भान तू

तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
सुख ओंजळीत
आज माइना

सुख ओंजळीत
आज माइना

हो तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा
तोल ऱ्हाइना

येडया काळजाचा
तोल ऱ्हाइना

मेघुटाची हूल तू
चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी
तहान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
गं भान तू

तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात
तुझी सावली

व्हइन फुफाट्यात
तुझी सावली

तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला
सोनपावली

आनू लक्षुमीला
सोनपावली

जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं
दान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
गं भान तू

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं
रं भान तू..

गीत : केवड्याचं पान तू
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अजय गोगावले, आर्या आंबेकर
संगीत लेबल: अल्ट्रा मराठी

Kevadyacha Paan Tu

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा