Kokan Kokan / कोकण कोकण
कोकण कोकण कोकण…
जिवाभावाची नाती ही कोकण
आपुलकीचा प्रवाह कोकण ..
निसर्ग राजाच हे कोकण..
परशुरामाची कृपा ही कोकण..
कोंबड्याच्या आरवण्याच आवाज कोकण..
गाई बैल वासरांची पहाट कोकण
कोकण कोकण,कोकण…..कोकण
गणपती पुळ्याच दर्शन कोकण
कोकण कोकण कोकण कोकण
देवदेवतांचा महाल कोकण
कोकण कोकण कोकण कोकण
लाल परीचा प्रवास कोकण
कोकण कोकण …
चीले कौलांचा घराचं कोकण
हे अंबा काजू नारळी फोपली कुळदाची पिठी आणि सोलकढी
भाकरी कालवणाची चव लय न्यारी…
कोकणची बायो जेवणात भारी..
कोकण कोकण ..
विहिरीच्या पाण्याची चव निराळी
शांती आनंदाची नदीचं व्हाई
सरावलेला सडा , मातीतले खेळ
अशी गर्द छाया कुठेच नाही
कोकण कोकण ..
मायेचा सागर प्रेमाचा डोंगर (२)
भक्ती ची ओंजळ आहे कोकण …
सणांचा कोकण , प्रथांचा कोकण
मुकुट मलवणीचा आहे कोकण ..
कोकण कोकण ..
पावसाच्या लावणीतला मौज हे कोकण ..
कोकण कोकण ..
गौरी गणपतीतल्या गाजा वाजा कोकण
कोकण कोकण ..
कला रत्नांची खाण हि कोकण
कोकण कोकण ..
दशावतार ची झिंग हि कोकण
हे गवडेत केले क्रांतीची निशाणी
दिन विती आणि छत्रपती…
(छत्रपती शिवाजी महाराज की जय)
होते इथे पावन जमितून गंगा माई
जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई …
कोकण कोकण……..
गीत : कोकण कोकण
गीतकार : प्रणय शेट्ये
गायक : सार्थक कल्याणी, शुभांगी केदार
संगीत लेबल: Draupadi Creations