Koral Naav / कोरलं नाव
कोरलं नाव मी श्वासवरी
पेरलं काटं तू पायी जरी
कोरलं नाव मी श्वासवरी
पेरलं काटं तू पायी जरी
पेटेल एक ज्योत प्रणात रं
राहील जन्मांतरी साथ रं
राहील जन्मांतरी साथ रं
कोडं तुझ कसलं रं
काय तुझा कावा
एक झाला जीव
कसा सोसलं दुरावा
ओ जीव लाऊनी येडं
पिरतीचं मी सपान रेखीलं
का रं झाकुनी डोळं
हे मरणाचं जाळ फेकीलं
लिही रं भाळीचा लेख पुन्हा
बदल तुझा ह्यो रिवाज जुना
देवपणा तुझा यात पणा लाव रं
बळ इतुकं माझ्या प्रेमात रं
बळ इतुकं माझ्या प्रेमात रं
राखी तुझी किरत तूच तू रं देवा
पिरतीचं मोल तू जाणशील कवां
राखी तुझी किरत तूच तू रं देवा
पिरतीचं मोल तू जाणशील कवां
खळंना पाणी डोळी करुण कहाणी
जन्मदाता होई रं बाप्पा दीनवाणी
खळंना पाणी डोळी करुण कहाणी
जन्मदाता होई रं बाप्पा दीनवाणी
त्याच्या आतड्यास पाडशी का पीळं
त्याच्या काळजास लावीशी की टाळं
पुस डोळ, करी काळावरी मात रं
सरलं अवसची ही रात रं
सरलं अवसची ही रात रं
संकटात वाट तू दाव की रं देवा
का रं असा लावशी घोर जीवा
संकटात वाट तू दाव की रं देवा
का रं असा लावशी घोर जीवा
पायाखालची सरकली धरा
उडती ठिकऱ्या तडा या अंबरा
पायाखालची सरकली धरा
उडती ठिकऱ्या तडा या अंबरा
लाटा घालती तांडव
वणव्यात उभा जीव
लाटा घालती तांडव
वणव्यात उभा जीव
तारी तुच आता वेगी धाव रे
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला …
गीत : कोरलं नाव
गीतकार: यशोधन कदम,
गायक : अजय गोगावले,
संगीत लेबल: झी म्युझिक कंपनी
गीत संग्रह / चित्रपट : आय प्रेम यू