Kunya Gavacha Aala Pakhru / कुण्या गावाचं आलं पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय् डौलात, न् खुदूखुदू हसतंय् गालांत
कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय् हं
आपल्याच नादात, ग बाई बाई आपल्याच नादात
मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय् गिरकी
किती इशारा केला तरी बी
आपल्याच तालात, न् खुदूखुदू हसतंय् गालात
कशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी
कशी कामिना चुकून आली
ऐने महालात, न् खुदूखुदू हसतंय् गालात
लाल चुटुक डाळिंब फुटं, मऊ व्हटाला पाणी सुटं
ही मदनाची नशा माईना
टपोर डोळ्यांत, न् खुदूखुदू हसतंय् गालात
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: सुशीला
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत