Lagali Aaj Satar Swarat / लागली आज सतार स्वरांत
लागली आज सतार स्वरांत !
आज स्पर्शिता अलगद पडदा
उठे हवा तो दिड्दा दिड्दा
फुलुनी येती भाव कधी जे रुतले खोल उरांत !
माझी असुनी माझी नव्हती
ती माझी हो, सूरसंगती
वाहत वाहत जीव मिसळला सौख्याच्याच पुरात !
साज लागला, साथ लाभली
नवगीतांच्या आता मैफली
बेसुर, कणसुर कधीच दडले काळाच्या उदरात !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: ओवाळणी
गीत प्रकार: चित्रगीत