Lajira / लाजीरा
अशी कशी थोडी लाडी गोडी तुझी
अशी कशी थोडी लाडी गोडी तुझी
वाट भरजरी वाटते
लाज साज तुझी कानी वेडी गाणी
रात चांदनी भासते
उधाण तुझ्या ह्या गुलाबी
रंगात गातो गं मी मारवा…
ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा
ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा
टिपूर डोळ्यात, काजळ तोऱ्यात
टिपूर डोळ्यात, काजळ तोऱ्यात
रूप तुझं भारलं…
मेघाच्या सरीत, आभाळ हातात,माझं मला घावलं
असूनही नसणारा, छेडणारा तुझा गार वारा
होऊन मी बेभान, बरसतो तुझ्याच धारा
उधाण तुझ्या ह्या गुलाबी रंगात गातो गं मी मारवा
ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा…
हलकी चाहूल तू माझी
मी मला वाहिले रे तुला
लेणं साताजन्माचं
माझं प्रेम सदा साथीला
सांज भरून आली
रंग दाटून आले
तुझ्या अलवार पावलानं
गंध मला माळ ना…
ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा
ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा…
गीत : लाजीरा
गीतकार : विपुल घंगाळे
गायक : केवल वाळंज, स्नेहा महाडिक
संगीत लेबल: सप्तसुर म्युझिक