Lal Divyacha Gadila / लाल दिव्याच्या गाडीला
राजा राणीच्या जोडीला पाच मजली माढीला…2
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला..2
तू कूळाचा भिकारी आता आली य भालधारी
या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी
जत्रा उरुसं करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला…2
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला..2
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भिम
शिळ तुकड चारलं त्यांना करतोय सलाम
तुला मुभाच नव्हती रं कुठं मंदिर चवडीला…2
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला…2
मोठा साहेब झालास बापाला विसरलात
गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडाचं
असता महाग तू वेड्या आता बिडी न काडीला…2
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला…2
तूला भिमाने माणूस केल तुझ्यासाठीच श्रम वेचील
नको विसरु भिमा चे मोल बोल गर्वाने जय भिम बोल
तूला भिमाने माणूस केल तुझ्यासाठीच श्रम वेचील
नको विसरु भिमा चे मोल बोल गर्वाने जय भिम बोल
भिमकार्यात जानराव कधी वेळ ना दवडीला
भिमकार्यात जानराव कधी वेळ ना दवडीला
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला..2
राजा राणीच्या जोडीला पाच मजली माढीला
राजा राणीच्या जोडीला पाच मजली माढीला
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला
गीत : लाल दिव्याच्या गाडीला
गायक : आनंद शिंदे
संगीत लेबल: T-Series Bhakti Sagar