Love Shayari in Marathi
तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे, तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात, माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो, आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो, दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा, खुप वेळ असेल तुमचाकडे, आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा, कविता नुसत्याच नाही सुचणार, त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.
फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही त्याला प्रेम कधीच उमजत नाही.
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.
हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय, हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर खूप घाबरतोय मी पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.
तुझ्या प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, मी फक्त तुझीच आहे.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही, तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती.
तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो. तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.
तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको, फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.
वाटत कधी कुणी आपलही असाव, उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव, दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार, आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं. सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात, पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
या जगात प्रेम तर सर्वच करतात, प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट, आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः रडून तुला हसवेल.
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.
प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो, असे का बरे होते हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा, खुप वेळ असेल तुमचाकडे, आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा, कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.
तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास आयुष्य जगायला पुरेसा आहे मला काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.
तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.
रस्ता बघून चल. नाहीतर एकदिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण, तुझ्याशिवाय माझ मनं, दुसऱ्या कुणात रमलेच नाही.
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन. ती आपली मुलगी असेल.
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे, अग वेडे कस सांगू .. तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.