Majhi Priya Hasavi / माझी प्रिया हसावी
स्वप्नात चांदण्याच्या जणू पौर्णिमा दिसावी
होऊन आज राधा, माझी प्रिया हसावी
कुजबुजली ही पानफुले ग
गुपित राधिके मला कळे ग
अवचित धागा कसा जुळे ग
ही रेशीमगाठ बसावी
मी मनहरिणी, मी वनराणी
भ्रमर छेडितो गुंजत गाणी
माठ थरथरे, निथळे पाणी
माझी लाज रुसावी
प्रतिमा शकुंतलेची, माझी प्रिया हसावी
शृंगाराच्या निबिड वनाचे
जपतप सारे खेळ मनाचे
डोळे मिटुनी ध्यान कुणाचे प्रीती कशी फसावी
होऊन मेनका ही, माझी प्रिया हसावी
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट: जावयाची जात
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत