Majo Lavtay Dava Dola / माजो लवताय् डावा डोळा
माजो लवताय् डावा डोळा
जाइजुईचो गजरो माळता
रतनअबोली केसान् फुलता
काय शकुन, शकुन गो सांगताय् माका?
बाय, माजो लवताय् डावा डोळा !
माजे कानार भंवर भोवता
माजे गालाक बाय भिडता
सगळ्या अंगार शिर्शीर येता
माजो पदर वार्यार उडता
मनचो बकुळ गो परमाळता
काय शकुन, शकुन गो सांगताय् माका?
बाय, माजो लवताय् डावा डोळा !
माजे दोळ्यांत सपनाच्या वाटेर
कोन बाय येता न जाता?
माजे ओठार माजेच गाणे
कोन बाय येऊन गाता?
माजोच बोल बाय उलैता
काय शकुन, शकुन गो, सांगताय् माका?
बाय, माजो लवताय् डावा डोळा !
गीत: शान्ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: महानंदा
गीत प्रकार: चित्रगीत