Mala Aana Ek Hiryachi / मला आणा एक हिर्याची
माझ्या शेजारी येउन बसता
हवंनगं काहीच ना पुसता
तुम्ही नुसतेच गालांत हसता
नगं फुकाची साखरपेरणी
मला आणा एक हिर्याची मोरणी !
नव्या नवतीत पहिलीवहिली
पोरपणाची हौस माझी र्हाइली
इतके दिवस वाट म्यां पाहिली
जीव नुसताच लावलाय झुरणी
एक सोन्याचं कोंदण घडवा
मधि लाखाची हिरकणि जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा
करून थकले तुमची मनधरणी
गीत: शान्ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: पवनाकाठचा धोंडी
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत