Music

Manuja Jaag Jara Lyrics || मनुजा जाग जरा लिरिक्स

Manuja Jaag Jara / मनुजा जाग जरा 

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून
पाहे
जय जय रघुवीर समर्थ
हि दुनिया…हि दुनिया…हि दुनिया मायाजाल मनुजा जाग
जरा… (२)
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे?
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा…..(२)

फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले…(२)
बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……(२)

फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग……(२)
थोडे द्यावे थोडे घ्यावे, एक मेका प्रेम द्यावे
हो जीवनाला रंग यावे, अवघे आनंदाचे रंग उधळावे…..(२)
चाकावाचून गाडी नाही, ताकावाचून लोणी
अन मित्रावाचून जगात कैसा जगेल म्हणून कोणी
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……(२)

फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग…….(२)
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे?
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा…..(२)
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग……(२)
गीत : मनुजा जाग जरा
गीतकार : शांताराम नांदगावकर
गायक : सुरेश वाडकर · सचिन · अरुण पौडवाल · शांताराम नांदगावकर
संगीत लेबल:Suresh Wadkar Official

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं