आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके स्फूर्ती गीत

Marathi Paul Padate Pudhe Marathi Lyrics | मराठी पाऊल पडते पुढे

Marathi Paul Padate Pudhe / ​मराठी पाऊल पडते पुढे

खरा स्वधर्म हा आपुला
जरि का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला, भला देखे

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।

कोट छातीचा अभंग त्याला कधी न जातील तडे

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपाऊली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज:प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

 

गीत: शान्‍ता शेळके
संगीत: आनंदघन
स्वर: मीना खडीकर, हेमंतकुमार, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,लता मंगेशकर
चित्रपट: मराठा तितुका मेळवावा
गीत प्रकार: स्फूर्ती गीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते