मराठी उखाणे

Marathi Ukhane For Fauji | फौजी उखाणे

Marathi Ukhane For Fauji

तिरंग्याला मी नमस्कार करते, खाली वाकून,
_____राव आहेत फौजी, त्यांच मी नाव घेते सर्वांचा मान राखून.
फौजी आहेत देशाची आण, बाण, शान,
______ राव आहेत, माझा स्वाभिमान.
कितीही बर्फ पडुदे, तरी फौजी सीमेवर देतात पहारे,
____ रावांच्या आवाजाने, शत्रूच्या अंगावर येतात शहारे.
फौजींची स्टाईल आहे, लय भारी,
______ रावांनी पूर्ण केली, माझी इच्छा सारी.
कधीही बोलवले कि, व्हावे लागते फौजीना हजर,
_____ रावांना नको लागूदे, कोणाची नजर.
रात्रीची स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी, गंभीर असते स्तिथी,
_____ राव फौजी असताना, नाही कोणाची भीती.
फौजीचा पोशाख बघून, ताठ होते मान,
____ राव आहेत ______ घराण्याची शान.
फौजी आहेत, देशाच्या पाठीचा कणा,
______ रावांचे नाव घेते, भारत माता कि जय म्हणा.
फौजी बनायला लागतो, अंगात जिगर,
_____ राव सोबत असताना, नाही मला कसली फिकर.
फौजींच्या त्यागामुळे, स्वराज्य हाती आले,
_________ शी लग्न करून, मनोरथ पूर्ण झाले.
देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, सीमेवर दिवस-रात्र पहारा आहे,
____ राव आहेत फौजी म्हणून, मला फार अभिमान आहे.
फौजी दिवस-रात्र, सीमेवर देतात पहारा,
_____राव आहेत, माझ्या आयुष्याचा सहारा.
फौजिना संपूर्ण जगात, आहे खुप मान,
_____रावांची पत्नी झाले म्हणून, मला आहे अभिमान.
तो सीमेवर लढत असतो, म्हणून आपण शांत झोपतो सर्व,
___ आहेत फौजी, म्हणून आहे मला गर्व.

You may also like

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली