Marathi Ukhane For Female
आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,
________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
___________ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.
येवले चहा म्हणजे, प्रेमाचा,
_________ रावांचे नाव घेते, मान राखुन सर्वांचा.
सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात,
______ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.
होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात, घेतात सर्व उखाणे,
_______ रावांमुळे माझे, आयुष्य चालले आहे सुखाने.
पैठणीवर शोभे, सुंदर मोरांची जोडी,
_______ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
आई वडील, पहिले माझे गुरु,
________ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.
लग्नाच्या आधी, बांधला नवीन बंगला,
_______ रावांच्या प्रपंचात, जीव माझा रंगला.
संध्याकाळची बत्ती लावायचा, टाईम असतो सात,
_______ रावांना देईल मी, जन्मो जन्माची साथ.
शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर,
_______ रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.
दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,
______ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.
लग्नात बांधला, सर्व पाहुण्यांनी फेटा,
_______ रावांच्या संसारात, माझा आहे अर्धा वाटा.
चांदीची जोडवी, पतीची खूण,
_________ रावांचे नाव घेते, आजपासून झाली _घराण्याची सून.
भजन करताना लागते टाळ, ढोलकी आणि विना,
______ रावांचे नाव घेते, जय महाराष्ट्र म्हणा.
महाराष्ट्रात असावे, मराठी भाषेचे वर्चस्व,
_________ राव आहेत, माझे सर्वस्व.
पुण्याला आहे आळंदी ,
_________ माझ्या आयुष्यात आले, म्हणून आहे मी आनंदी.
गुणवान पती मिळावा, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
______ राव माझ्या, जीवनातील मौल्यवान ठेवा.
माहेर सोडून येताना, डोळ्यात होते आसू,
______ रावांच्या प्रेमळ संसारात, ओठावर असतं हासू.
श्रीमंत असोवा गरीब असो, स्त्रियांना आवडते माहेर,
_________ रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर.
नव्या नवरीचा आज उतरला साज,
खऱ्या अर्थाने गृहिणी ________ रावांची झाले आज.
देवा सारखा पिता, आणि देवी सारखी माता,
_________ राव मिळाले, स्वर्ग आला हाता.
गणपती बाप्पाचे, चरण स्पर्श करते खाली वाकून,
_______ रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.
कपाळावर कुंकू, जसा चंद्रकोर चा ठसा,
_________ रावांच नाव घेते , सर्वजण बसा.
पैठणी साडी आहे, महाराष्ट्राची शान,
________ रावांचे नाव घेताना, मला वाटतो अभिमान.
ऊन पावसात कष्ट करून, पिकवलं शेतात सोन,
_________ राव हेच माझ्या, सौभाग्याच लेणं.
नूतन वर्षाचा शुभारंभ करीत, येतो पाडवा,
_______ रावांच्या सानिध्यात, राहो सदैव गोडवा.
सर्वांच्या नावाप्रमाणे, वेगवेगळ्या आहेत राशी,
_________ रावांचे चरण, हीच माझी अयोध्या काशी.
वोटिंग करण्यासाठी, लाईन लागली क्रमाने,
_______ रावांचे नाव घेते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
हिमालय पर्वतावरून, नदी वाहते कलिका,
_______ रावांचे नाव घेते, मी पाटलांची बालिका.
मंडप सजवण्यासाठी, आणली छान छान फुले,
_______ रावांचे नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.
आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर पाहिजे जिद्द,
__________ रावांसोबत राहून करेन, संपूर्ण स्वप्न सिद्ध.
आई बाबा आहेत, सर्व प्रथम गुरु,
______ रावांसोबत आजपासून, पुढचा प्रवास सुरु.
संस्कृत भाषेमुळे, सर्व भाषा झाल्या तयार,
_______ रावांचे इंग्रजी ऐकून, झाले मी घायाळ.
आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस,
______ रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.
विवाहाच्या मंडपात, सुंदर फुलांचा थाट,
______ रावांचे नाव घेऊन बांधते, वधू वराची गाठ.
आहे मी एकुलती एक, नाही कधी वाईट केले कसले सेवन,
______ तुमच्यासाठी शिकेन मी, बनवायला जेवण.
कोकणात आहेत, जंगल घनदाट,
_______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
निवडणूक लढायला, आहेत खूप पक्ष,
________ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्ष.
संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज,
__________ आणि माझे झाले लव्ह मॅरेज.
चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा,
_______ रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.
फुलांचा सुगंध, दरवळला चहूकडे,
_______ रावांचे नाव, मोठं होउदे सगळीकडे.
मंगळसुत्रात असतात ,काळे मणी,
_________ राव आहेत, माझे धनी.
रायगडावर केले मी, शिवरायांचे दर्शन…
________ रावांच्या प्रेमासाठी, संपूर्ण जीवन अर्पण.
लग्नकार्य हा आयुष्यातील एक, महत्वाचा भाग आहे,
________ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे.
शंकर पार्वतीचे, हिमालय आहे उगमस्थान,
____ रावांचे नाव घेऊन, ठेवते सर्वांचा मान.
हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र,
_____ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.
चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे,
__________ च नाव घेते देवापुढे.