भावगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Mi Ek Tula Phool Dile Marathi Lyrics | मी एक तुला फूल दिले

Mi Ek Tula Phool Dile / मी एक तुला फूल दिले

मी एक तुला फूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता !
त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता !

हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता !

का पान फूल लज्जेने चूर जाहले?
का सळसळत्या वाऱ्याचे नूपुर वाजले?
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता !

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता !

 

गीत: शांताराम नांदगांवकर
संगीत: श्रीधर फडके
स्वर: सुरेश वाडकर
गीत प्रकार: भावगीत

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा