Mi Katyatun Chalun / मी काट्यातून चालून
मी काट्यातून चालून थकले
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी
तू निमताला ढोल वाजवित
झिंग चढली मला न्यारी
डोंगरमाथा जिंकून आलो
बळ मुठीत या भारी
दिमाख नस्ता नगं दाखवू
घोड्यावरती येड्या थाटोनी
तू मावळचा राजा जैसा
मी ह्या मातीची महाराणी
नगं रुसू कस्तुरी तुझ्याविन
कशी जिवाची मनकरणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळमाथ्याचं पाणी
मी मर्दाची राणी झाले..
दोरीवरल्या झोपाळ्यांचा
झोका गेला गेला भिंगोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझा राया माजोरी
मी वार्याशी बोलून आले..
ह्या शेताच्या मातीमधला
गंध पिकातून निखरोनी
हिरव्या झाडातुनी झळकली
लखलख तेजाची लेणी
मन पाखरू धुंद झाले..
गीत: ना. धों. महानोर
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट: सर्जा
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत