Mi Majvar Bhulale Bai / मी मजवर भुलले बाई
मी मजवर भुलले बाई
भाव बोलके माझ्यासंगे, प्रीती अबोल राही
मनातले मन होई जागे
कळला हेतू, जुळले धागे
खुळी सावली माझ्या मागे, मलाच पुसते काही
नको विचारू कमळ्फुला रे
सांगितल्याविण कळे तुला रे
तरंग उठता येत शहारे माझ्या कोमल देही
स्वप्न रेखिता गोजिरवाणे
मला खुणविती डोंगर-राने
संसाराचे मंजूळ गाणे नकळत ओठी येई
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: आशा भोसले
चित्रपट: ईर्षा
गीत प्रकार: चित्रगीत