Mitun Dole Ghetale Mi / मिटुन डोळे घेतले मी
मिटुन डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते
कोण मी अन् कोण ते !
गाइल्यावाचून त्यांनी गीत त्यांचे ऐकते
भेटल्यावाचून त्यांना गुज माझे सांगते
नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते
तेच ओठी घोळताना मी स्वत:शी लाजते
भावनांचा भास का हा? कल्पनांची कूजिते?
वचन नाही घेतले मी वाट तरीही पाहते
बोलले काहीच ना ते, मी न काही जाणते
जोडते जीवांस दोन्ही मुग्ध नाते कोणते?
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: आशा भोसले
चित्रपट: बाळा जो जो रे
गीत प्रकार: चित्रगीत