उषा मंगेशकर चित्रगीत भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Na Na Na Nahi Nahi Ga Marathi Lyrics | ना ना ना नाही नाही

Na Na Na Nahi Nahi Ga / ना ना ना नाही नाही

ना ना ना ना नाही नाही नाही ग !
आता पुन्हा मजसी येणे नाही ग !

घन भरुन भरुन झरे गगन वरून
कुणी साजण दुरून मज दिसे की हसे
खुणवी सये बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

बोलती चुडे किण किण किण, कलशी जल गाते ग !
नूपुर बोले छुन छुन छुन, पाऊल पुढे जाते ग !
नवल घडे अहा अहा अहा
हृदय धडधडे की उडे पदर सये बाई ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

गहन वन झाले ग शीतल वारा
भिजली तनु सारी ग झेलून धारा
पवन वाजे सण सण सण, वेढुन मज घेतो ग
भ्रमर बोले गुण गुण गुण, साजण साद देतो ग !
नयन झरे अहा अहा अहा
अधर थरथरे की झुरे आतुर मन बाई ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

नाही सुचत काम, नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे की हसे
सजण ठायी ठायी ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !

 

गीत: शान्‍ता शेळके
संगीत: मानस मुखर्जी
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते