Nako Re Nandalala / नको रे नंदलाला
नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !
भरुनिया रंग पिचकारी
भिजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा हरे रामा
अंगणी माझ्या करिसी दंगा
वेळीअवेळी तू श्रीरंगा
भलत्या ठायी झोंबसी अंगा
गौळणीभवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारदरात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा हरे रामा
नको रे नंदलाला नंदलाला !
खुदुखुदु हससी रे गिरिधारी
कशी रागावू तुजसी, मुरारी?
अवचित अडविसी यमुनातीरी
किती सोसावी ही शिरजोरी?
मागशील भलते काही
हरी तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा हरे रामा
नको रे नंदलाला, नंदलाला !
गीत: शान्ता शेळके
संगीत: अनिल-अरुण
स्वर: आशा भोसले
चित्रपट: नांव मोठं लक्षण खोटं
गीत प्रकार: चित्रगीत