Navratri Special Ukhane in Marathi
नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस, आणि पिवळा रंग, _________ राव राहूदे माझ्या आयुष्यात, ७ जन्मी संग.
आज आहे दुसरा दिवस, आणि रंग आहे Green, _____ राव नेहमी म्हणतात, उन्हात जाताना लावत जा Sunscreen.
जोडीदार चांगला मिळावा, यासाठी अंबे माते जवळ करत होते Pray, ___________ रावांचे नाव घेते, आजचा रंग आहे Grey.
फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर, नाचते सारी मंडळी, _________ रावांच्या नावाची, लग्नगाठ बांधली.
नवरात्रीमध्ये नवं दिवस, रंगीत घालतात साडी, ________ रावांनी प्रॉमिस केलंय, ह्या वर्षी तरी घेईन गाडी.
आज आहे देवीच्या, साडीचा रंग हिरवा, आणि ________ रावांकडे मागणे मागते, मला संपूर्ण भारत देश फिरवा.
आजचा रंग आहे, जांभळा, _______ रावांना गरबा येत नाही, त्यांना सांभळा.
आज सर्वांनी नेसल्या आहेत, साड्या Pink, ________ रावांसोबत माझे नाते, झाले आहे Link.
निळ्या निळ्या आकाशात, पांढरे पांढरे ढग, _______ राव आयुष्यात येताच, विसरले मी सारे जग.
आजचा रंग आहे लाल, ________ रावांच्या जीवनात, आहे मी खुशहाल.
आजचा रंग आहे, देवीचा White, ________ रावांच्या येण्याने, आयुष्य झाले माझे Bright.
देवीला नेसवली आहे, आज साडी Orange, ______ रावांसोबत झाले माझे, अरेंज Marriage.
सत्यनारायण पूजेला, देवासाठी वाचतात पोती, _______ रावांचे नाव घेते, आणि देवी मातेची भरते मी ओटी.
नऊ दिवस, ९ रंगांचा असतो मान, ______ रावांचे माझ्याशिवाय, हलत नाही पान.
अनवाणी पायाचा, ठेवला आहे मी उपवास, _______ रावांचे नाव घेते, मी तुमच्यासाठी खास.
पिवळ्या रंगाने सजली आहे, देवी माता, _______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट आता.