Nighale Asatil Rajkumar / निघाले असतील राजकुमार
निघाले असतिल राजकुमार
पथ मिथिलेचे असतिल चुंबित कमळदळें हळुवार
कुठे पहाटे तृणांकुरांवर धुके पसरले असेल सुंदर
हिमरंगावर निळी पाऊले उमटवित सुकुमार
कुठे तरुतळी सायंकाळी विसावेल ती मूर्त सांवळी
तरुशाखांनी असेल केला तारासम झंकार
अंग थरथरे लवती लोचन समीप असतिल श्री रघुनंदन
आज स्मराने हळू उघडिले आर्त मनाचे द्वार
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: आशा भोसले
चित्रपट: स्वयंवर झाले सीतेचे
गीत प्रकार: चित्रगीत