Nilya Abhali Katar Veli / निळ्या अभाळी कातरवेळी
निळ्या अभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती
मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनि एकरूप होती
मनमंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीतफुलांना
पाच जिवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती
गीत: शान्ता शेळके
संगीत: आनंदघन
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: मोहित्यांची मंजुळा
गीत प्रकार: चित्रगीत